जीवनावर सर्वश्रेष्ठ विचार मराठी मधे, Inspirational Quotes In Marathi With Images
जीवनावर सर्वश्रेष्ठ विचार मराठी मधे, Inspirational Quotes In Marathi With Images
आयुष्य आईस्क्रीम सारखे आहे, Taste केले तरी वितळते, Waste केले तरी वितळते, म्हणून ते Taste करायला शिका.
जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधीच जमणार नाही
आयुष्य कोणासाठी थांबत नाही, फक्त आयुष्य जगण्याची कारणे बदलतात, सर्व प्रश्न सोडवून सुटत नाही, तर काही प्रश्न सोडून दिले तर आपोआपच सुटतात.
कोणते फुल दुसऱ्या फुलाशी स्पर्धा करत नसतं कारण, त्याला माहिती असतं निसर्गाने प्रत्येकाला वेगळे बनवले आहे. आणि प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिले आहे.
एखादा गुन्हेगार ठरवतांना त्याच्या जागी स्वतःला ठेवून बघा.
आयुष्यात आपण आपली Image किती चांगली बनवण्याचे प्रयत्न केला, तरी तिची Quality समोरच्या व्यक्तीच्या Clearity वरच अवलंबून असते.
प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका, कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता, कळते तुमची नाही.
नशीबावर विश्वास ठेवण्याऐवजी,आपली शक्ती आणि कर्मावर विश्वास ठेवा.
देवाकडे काही मागण्याची ही वेळ नाही, तर जे आहे त्याचे आभार मानण्याची वेळ आहे.
खळखळून हास्य आणि पुरेशी झोप हे, कोणत्या रोगावरचे रामबाण इलाज आहे.
दुसऱ्याचे भले व्हावे असे चिंतणारा माणूस, त्यावेळी आपलेही भले साधत असतो.
Inspirational Quotes In Marathi
काहीवेळा आपली चूक नसतानाही शांत असणे आवश्यक असतं, कारण जोपर्यंत
समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही.
एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेलेत, याचं कारण हेच की जसजसे
आपण मोठे होत जातो, तसंतसं आपल्या चुका खोडल्या नाही जात.
परिवर्तनाची इच्छा असेल तर ती तसेच रहाण्याच्या इच्छे पेक्षा अधिक तीव्र असायला हवी.
सुरुवात करण्यासाठी तुम्ही महान असणे गरजेचे नाही,
तर महान होण्यासाठी सुरुवात करणे गरजेचे आहे.
For Daily Updates Follow Us On Facebook
आयुष्यात छोट्या-छोट्या गोष्टीत समाधान मानून हसायला शिका, कारण कोणास ठाऊक मोठ्या गोष्टी मिळेपर्यंत समाधानाने हसू टिकवता येईल का !
मोडतोड करायला ज्ञान लागत नाही, मात्र तडजोड करायला खूप शहाणपण लागतं.
औषधे फक्त रोगाचा इलाज करतात, रुग्णाला तर डॉक्टरच बरे करतात.
यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या व्यक्तीने आपले निर्णय बदलतात.
तुम्ही कितीही पात्र असला तरीही, एकाग्रचित्त होऊनच महान कार्य करू शकता.
राग हा माणसाचा कितीही मोठा शत्रू असला तरी तो योग्य वेळी आलाच पाहिजे, नाहीतर लोक राग न आल्याचा फायदा उचलतात.
स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करा, नाहीतर लोक त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडून काम करून घेतील.
अडचणी येतात याचा अर्थ असा नाही की नैराश्य यावे, याचा अर्थ तुम्ही तातडीने ताकदीने पुढे जावे असा आहे.